मेडेलीन- जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन केले आहे. कोलंबियातली मेडलीन शहरात जनतेला जीवनावश्यक सुविधा पुरविण्यासाठी रोबोटचा वापर केला जात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
कोलंबियामध्ये रोबोटद्वारे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा - Robots in Colombia
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोलंबिया येथील मेडलीन शहरात जनतेला रोबोटद्वारे जीवनावश्यक सुविधा पुरविल्या जात आहेत. डिलिव्हरी बॉयचा ग्राहकांशी थेट संपर्क टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
![कोलंबियामध्ये रोबोटद्वारे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा Robots help deliver goods Colombia government Colombia coronavirus cases Kiwibot Robots in Colombia Robots in Colombia amid lockdown](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6905292-612-6905292-1587622968797.jpg)
डिलिव्हरीची सेवा देणारे प्रसिद्ध अॅप राप्पी आणि टेक कंपनी किवीबोट यांनी १५ रोबोट तयार केले आहेत. त्याद्वारे ग्राहकांना सुरक्षीतरित्या अन्न पुरवले जाते. डिलिव्हरी बॉयचा ग्राहकांशी थेट संपर्क टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात कोलंबिया वापरत असलेले राप्पी अॅप अतिशय लोकप्रिय आहे.
कोलंबियामध्ये सध्या ४ हजार १४९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तसेच आतापर्यंत १९६ मृत्यू झाले आहेत. अनेकांना अतिशय सैम्य लक्षणे आहेत. मात्र, वृद्धांना तापासह न्युमोनियाचे तीव्र लक्षणे दिसत आहेत.