महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अमेरिकेत कोलंबस यांचा पुतळा उखडून, आग लावून फेकला तळ्यात - अमेरिकेतील हिंसाचार

जॉर्ज फ्लॉइड यांच्या झालेल्या हत्येमुळे अमेरिकेत उसळलेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. अमेरिकेतील रिचमंड शहरात आज आंदोलनकर्त्यांनी क्रिस्टोफर कोलंबस यांचा पुतळा मोडून काढला, त्याला आग लावली आणि नंतर तळ्यातील पाण्यात फेकून दिला. याप्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

कोलंबस यांचा पुतळा
कोलंबस यांचा पुतळा

By

Published : Jun 10, 2020, 6:16 PM IST

रिचमंड (अमेरिका)- पोलिसांकडून 46 वर्षीय कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड यांच्या झालेल्या हत्येमुळे अमेरिकेत उसळलेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. अमेरिकेतील रिचमंड शहरात आज आंदोलनकर्त्यांनी क्रिस्टोफर कोलंबस यांचा पुतळा मोडून काढला, त्याला आग लावली आणि नंतर तळ्यातील पाण्यात फेकून दिला. याप्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

शहरातील बायार्ड पार्क येथे मंगळवारी रात्री साडेआठ वाजता आंदोलनकर्ते एकत्र जमले होते. त्यावेळी जवळपास दोन तासांच्या कालावधीत अनेक दोरखंड बांधून पुतळ्याला खाली खेचले आणि पुतळा पाडला. त्यानंतर पुतळा असलेल्या ठिकाणी स्प्रे पेंटिंगने लिहिले की, ‘कोलंबस हा नरसंहाराचे प्रतीक आहे’. त्यानंतर पुतळ्याला आग लावण्यात आली आणि नंतर तो तळ्याच्या पाण्यात फेकण्यात आले.

या घटनेवेळी पोलीस तेथे उपस्थित नव्हते. मात्र, पोलिसांचे हेलीकॉप्टर वरून घिरट्या घालत असल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले आहे. रिचमंड येथे डिसेंबर 1927 मध्ये कोलंबस यांचा पुतळा उभारण्यात आला होता. अमेरिकेतील हा त्यांचा पहिलाच पुतळा होता. जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा अमेरिकेत पोलीस कारवाईदरम्यान मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेसह जगभरात मोर्चे आणि आंदोलने सुरू झाली आहेत.

काय प्रकरण ?

मिनिआपोलिस शहरात 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉइड यांच्या गळ्यावर गुडघा ठेऊन बसलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये जॉर्ज आपल्याला श्वास घेता येत नसल्याचे या पोलिसाला सांगतानाही दिसत आहेत. 'मला श्वास घेता येत नाही. कृपया माझा जीव घेऊ नका', अशी विनवणी जॉर्ज फ्लॉइड पोलिसांना करीत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले होते. यानंतर फ्लॉईड यांचा मृत्यू झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details