महाराष्ट्र

maharashtra

चीनच्या आक्रमणाचा अमेरिकेच्या संसदेत निषेध; भारताच्या ठामपणाचे कौतुक

By

Published : Aug 14, 2020, 3:02 PM IST

दोन्ही संसद लोकप्रतिनिधींनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात पूर्व लडाखमध्ये 20 भारतीय जवानांना वीरमरण आल्याच्या 15 जूनच्या घटनेचाही उल्लेख केला आहे. चीनने पूर्व लडाखमध्ये केलेल्या कृत्यानंतर पीपल्स ऑफ चीनकडून प्रदेश विस्कळित होण्याचा धोका थांबवावा लागणार असल्याचे मार्क वॉर्नर यांनी म्हटले आहे.

प्रतिकात्मक-भारत-चीन संबंध
प्रतिकात्मक-भारत-चीन संबंध

वॉशिंग्टन– चीनबरोबर तणावाची स्थिती असताना देशाचा जुना मित्र असलेल्या अमेरिकेने भारताची स्पष्ट बाजू घेतली आहे. अमेरिकेच्या दोन प्रभावशाली लोकप्रतिनिधींनी (सिनेट) भारताच्या दिशेने घुसखोरी करत नियंत्रण रेषेते बदल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनचा निषेध केला आहे. हा निषेध करणारा ठराव संसदेमधील लोकप्रतिनिधी जॉन कॉरनिन आणि संसदल लोकप्रतिनिधी मार्क वॉर्नर यांनी संसदेत सादर केला.

जॉन कॉरनिन हे बहुमत असलेल्या रिपब्लकिन पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. तर मार्क वॉर्नर हे अमेरिकन संसदेच्या गुप्तचर समितीचे सदस्य आहेत.

दोन्ही संसद लोकप्रतिनिधी हे सेनेट इंडिया कॉकसचे उपाध्यक्ष आहे. ठरावाबात कॉरनिन म्हणाले, की सेनेट इंडिया कॉकसचे सहसंस्थापक असल्याने आम्हाला अमेरिका आणि भारतामधील दृढ संबधाचे महत्त्व माहित आहे. चीनच्या विरोधात उभे राहणाऱ्या भारताच्या वचनबद्धतेचे मी कौतुक करतो. तसेच इंडो-पॅसिफिक हा प्रदेश मुक्त आणि स्वतंत्र ठेवण्यासाठी भारताचे कौतुक करतो. यापूर्वी कधी नव्हे तेवढे आम्ही भागीदार भारताला पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे. कारण, त्यांनी चीनच्या आक्रमकतेला रोखले आहे.

दोन्ही संसद लोकप्रतिनिधींनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात पूर्व लडाखमध्ये 20 भारतीय जवानांना वीरमरण आल्याच्या 15 जूनच्या घटनेचाही उल्लेख केला आहे. चीनने पूर्व लडाखमध्ये केलेल्या कृत्यानंतर पीपल्स ऑफ चीनकडून प्रदेश विस्कळित होण्याचा धोका थांबवावा लागणार असल्याचे मार्क वॉर्नर यांनी म्हटले आहे. गेली अनेक वर्षे भारताबरोबर अमेरिकेने भागीदारीची आनंद घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये लोकशाहीची समान मूल्ये आहेत, असे मत वॉर्नर यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details