महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अमेरिकेत आढळला दुर्मीळ मंकीपॉक्स रोग; नायजेरियाहून आलेल्या प्रवाशाला लागण - Rare case of Monkeypox in USA

सीडीसी आणि टेक्सासच्या आरोग्य विभागाने 15 जुलैला मंकीपॉक्सची नागरिकाला लागण झाल्याची पुष्टी दिली आहे. हा अमेरिकन नागरिक नायजेरियाहून अमेरिकेत प्रवास करून आला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Jul 17, 2021, 7:21 PM IST

वॉशिंग्टन- जग कोरोना महामारीशी लढत असताना दुर्मीळ विषाणूजन्य रोग अमेरिकेत आढळला आहे. मंकीपॉक्स हा दुर्मीळ विषाणुजन्य रोग हा अमेरिकेतील टेक्सास राज्यामध्ये आढळला आहे. ही माहिती सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रिव्हेन्शनने (सीडीसी) दिली आहे.

सीडीसी आणि टेक्सासच्या आरोग्य विभागाने 15 जुलैला मंकीपॉक्सची नागरिकाला लागण झाल्याची पुष्टी दिली आहे. हा अमेरिकन नागरिक नायजेरियाहून अमेरिकेत प्रवास करून आला आहे.

हेही वाचा-Manappuram Gold लोनमधून 20 मिनिटात 17 किलो सोने लंपास; दोन चोरटे चकमकीत जखमी

मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाला डल्लास येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा रुग्ण लागोस, नायजेरियाहून डल्लास येथे आला आहे. आरोग्य कर्मचारी हे त्याच्या संपर्कात आलेल्या विमान प्रवाशांना संपर्क करत आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना रोगाची लागण झालेली असण्याची शक्यता आहे.

असा आहे मंकीपॉक्स

  • सीडीसीच्या माहितीनुसार मंकीपॉक्स हा दुर्मीळ परंतू गंभीर विषाणूजन्य रोग आहे.
  • या रोगाची सुरुवात फ्लूसारख्या आजारापासून होते.
  • रोगाची 2 ते 4 आठवडे लागण होते.
  • लहान मुलांमध्ये आढळणारा देवीचा रोग ज्या विषाणुपासून होतो, त्याच वर्गीकरणातील विषाणुमुळे मंकीपॉक्सची लागण होते.

हेही वाचा-व्हॉट्सअपचा दणका! एकाच महिन्यात बंद केली 20 लाख भारतीयांची अकाउंट

जगभरात सहा जणांना मंकीपॉक्सची लागण

मंकीपॉक्स हा श्वसनातील थुंकीच्या कणांपासून पसरतो, असे सीडीसीने म्हटले आहे. सध्याच्या घडीला नायरेजियातून सिंगापूर, इस्त्रायल, सिंगापूर आणि ब्रिटनमध्ये विमानाने गेलेल्या एकूण सहा जणांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे.

हेही वाचा-विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे शेअर विकून 792.11 कोटी रुपयांची रिकव्हरी

ABOUT THE AUTHOR

...view details