पनामा सिटी - पनामातील एका तुरुंगात झालेल्या गोळीबारात तब्बल 12 कैद्यांचा मृत्यू झाला. तर, आणखी 12 जण जखमी झाले आहेत. पनामा प्रशासनातील अधिकाऱ्याने ही माहिती दिली. तुरुंगाच्या एका ब्लॉकमध्ये हा गोळीबार झाला. येथे एकाच टोळीच्या सदस्यांना ठेवण्यात आले होते.
हेही वाचा -सीरियामध्ये बॉम्बवर्षाव, एकाच कुटुंबातील सात जणांसह 23 ठार
पनामा सिटीच्या 'ला जोयिता' या तुरुंगात तस्करीच्या माध्यमातून हत्यारे आणण्यात आली होती. घटनास्थळावरून पाच पिस्तूल आणि तीन रायफल्स ताब्यात घेण्यात आल्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.