न्यूयॉर्क- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. बुधवारी मबर्ग ग्लोबल बिझनेस फोरममध्ये आपल्या मुख्य भाषणानंतर त्यांनी अमेरिकेतील बड्या उद्योगपतींशी चर्चा केली. भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यासंबंधी यावेळी चर्चा केली. मोदींना भेटून बहुराष्ट्रीय कंपण्यांचे सीईओ चांगलेच भारावले होते.
भारतामध्ये गुंतवणूक करण्यास अमेरिकेतील बलाढ्य कंपन्या इच्छूक - #ModiinNewyork
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. बुधवारी मबर्ग ग्लोबल बिझनेस फोरममध्ये भाषणानंतर त्यांनी अमेरिकेतील बड्या उद्योगपतींशी चर्चा केली. भारतात गुंतवणूक करण्यासंबंधी बैठकीत चर्चा झाली. यावेळी मोदींना भेटून बलाढ्य कंपन्यांचे सीईओ चांगलेच भारावले होते.
मेटलाईफ कंपनीचे सीईओ मायकल खलाफ म्हणाले, की पंतप्रधान मोदी हे व्यापाराच्या वेगवेगळ्या पैलूंबाबत जाणून घेण्यास उत्सुक होते. भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमचे सरकार सहकार्य करेल, असे सीईओंनी सांगितले. गुंतवणूक करण्यासाठी भारत चांगला पर्याय आहे, असेही उद्योगपती म्हणाले.
पंतप्रधान मोदींना भेटून आनंद झाला. आमच्यामध्ये खूप चांगली चर्चा झाली. त्यांनी भारतातील व्यापार वाढीबद्दल सकारात्मक संकेत दिले, असे डेलोएट ग्लोबल कंपनीचे सीईओ पुनीत रेंजेन म्हणाले. मायक्रॉन कॉर्पोरेशनचे चेअरमन बॉब स्विस यांनीही चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितले. भारतातील व्यापार क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याबाबत पंतप्रधान उत्साही होते, असे स्विस म्हणाले. पंतप्रधान मोदींनी कोणत्या दिशेनं जायचं हे चांगल माहिती आहे. त्यांच्याकडे नवनवीन कल्पना आहेत. आज झालेल्या चर्चेमध्ये सर्वच उद्योगपती भारतामध्ये गुंतवणुक करण्यासाठी सकारात्मक दिसले, असे 'सिस्को' कंपनीचे माजी सीईओ, आणि भारत-अमेरिका भागीदारी मंचाचे चेअरमन जॉन चेंबर्स म्हणाले.