वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले असून ते आज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला (यूएनजीए) संबोधित करणार आहेत. यासंदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून एका ट्विटद्वारे देण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 6 वाजून 30 मिनीटांनी मोदींचे संबोधन होणार आहे. दरम्यान, आज त्यांच्या भाषणामध्ये कोरोना महामारी, हवामान बदल, दहशतवाद यासह इतर महत्त्वाचे मुद्दे असण्याची शक्यता आहे. शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर ते वॉशिंग्टनहून न्यूयॉर्कला रवाना झाले होते.
यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या 76व्या सत्राला 109 राष्ट्रांचे प्रतिनिधी स्वत: उपस्थित राहून संबोधित करणार आहेत. तर 60 राष्ट्रांचे प्रतिनिधी हे व्हिडीओ रेकॉर्डींद्वारे भाषण देणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या 75व्या सत्रात कोरोना महामारीमुळे सर्वच राष्ट्रांच्या प्रतिनिधींचे संबोधन व्हिडीओ रेकॉर्डींद्वारे झाले होते.
शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एक द्विपक्षीय बैठक पार पडली. यावेळी भविष्यातील भारत-अमेरिका संबंधावर चर्चा झाली. तसेच यावेळी बायडन यांनी 1972 मध्ये पहिल्यांदा सिनेटर म्हणून निवड आल्यानंतर बायडेन नाव असलेल्या एका व्यक्तीची गोष्ट सांंगितली. ते म्हणाले, 2013 मध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून मुंबईत आले असताना भारतात त्यांचे कोणी नातेवाईक आहेत का, असे त्यांना विचारण्यात आले होते. त्यावर ते उत्तर देताना म्हणाले. 'याबाबत मला काही खात्री नाही, पण 1972 मध्ये पहिल्यांदा सिनेटर म्हणून निवडून आल्यावर शपथ घेण्यापूर्वी मला बायडेन नावाच्या व्यक्तीचे पत्र मिळाले होते आणि ते पत्र मुंबईहून आले होते. मात्र, मी त्याचा पाठवुरावा करू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना सांगण्यात आले की, भारतात पाच बायडेन नावाचे व्यक्ती राहत आहेत. या किस्सावरून उपस्थितांमधील सर्वच हसायला लागले.
हेही वाचा- जो बायडेन यांनी महात्मा गांधींच्या जयंतीचा केला उल्लेख, पंतप्रधान मोदी म्हणाले...