वॉशिंग्टन डी.सी - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षीय निवडणूक ही या वर्षातील सर्वांत महत्त्वाची निवडणूक आहे. अमेरिकेत कोण सत्तेत येणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. सध्या 1.25 वाजेपर्यंत (भारतीय वेळेप्रमाणे) रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना 213 तर आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन 236 इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. विजयासाठी 270 इलेक्टोरल व्होट्सची गरज आहे. अमेरिकेतील राजकीय विश्लेषक रॉबर्ट कॅहली यांनी ट्रम्प यांच्या विजयाचा दावा केला आहे. रॉबर्ट कॅहली हे अटलांटा स्थित ट्रॅफलगर ग्रुपचे एक राजकीय विश्लेषक आहेत. ते यापूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांसाठी राजकीय सल्लागार होते.
डोनाल्ड ट्रम्प यांचाच होणार विजय, रॉबर्ट कॅहली यांचे भाकित - अमेरिका राष्ट्राध्यक्षीय निवडणूक निकाल
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचे भाकित राजकीय विश्लेषक रॉबर्ट कॅहली यांनी केले आहे. रॉबर्ट कॅहली हे अटलांटा स्थित ट्रॅफलगर ग्रुपचे एक राजकीय विश्लेषक आहेत.
ट्राफलगर ग्रुप आतापर्यंत कायम ट्रम्प यांच्या विजयाचे भाकित करत आला आहे. ट्रम्प यांचा थोड्याशाच फरकाने विजय होणार असल्याचे या ग्रुपचे म्हणणे आहे. 2016च्या निवडणुकीमध्येही ट्राफलगर ग्रुपने ट्रम्प यांचा मिशिगन आणि पेनसिल्व्हानिया राज्यात विजय होणार असल्याचा अचूक अंदाज वर्तवला होता. तो अंदाज खरा ठरल्यानंतर त्याने सर्व माध्यमांचे लक्ष वेधून घेतले होते.
जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहे. जो बायडेन यांना 236 इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. तर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना 213 इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या फ्लोरिडा, टेक्सासमध्ये बाजी मारली आहे. तर आणखी पाच ठिकाणांवर ते आघाडीवर आहेत.