न्युयॉर्क - भारताने जलसंरक्षणासाठी जलजीवन मिशनची सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर रेन वॉटर हार्वेस्टिंगचे कामही सुरू केले आहे. आता चर्चेची नाही तर कृतीची गरज आहे. तसेच पर्यावरणाला वाचवण्यासाठी भारत सज्ज झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी संयुक्त राष्ट्र संघात ते ग्लोबल वार्मिंगबाबत बोलत होते.
आता चर्चेची नाही तर कृतीची गरज, भारतात जलजीवन मिशनची सुरुवात - पंतप्रधान मोदी - modi on global warming
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी संयुक्त राष्ट्र संघात ते ग्लोबल वार्मिंगबाबत बोलत होते.
भारतात येत्या काही वर्षांमध्ये जल स्त्रोतांच्या संरक्षणासाठी ५० दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात येणार आहे. भारतात जैविक इंधनापासून पेट्रोल आणि डिझेल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.
ग्लोबल वार्मिंगबाबत जगामध्ये अनेक प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी विश्वव्यापी आंदोलन सुरू करण्याची गरज आहे. भारत पर्यावरणाबाबत फक्त बोलण्यासाठी नाहीतर प्रत्यक्ष कृती करण्यासाठी सज्ज झाला आहे. वाहतूक क्षेत्रात ई-मोबिलीटीला प्रोत्साहन देत आहोत. तसेच क्लीन कुकींग गॅस देखील वाटप केले असल्याचे पंतप्रधान म्हणाले.