वॉशिंग्टन : यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) च्या तिसऱ्या लीडरशिप समिटमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण असणार आहे. गुरुवारच्या सत्रामध्ये हे भाषण असणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यूएसआयएसपीएफचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी याबाबत घोषणा केली. सध्याच्या कठीण काळामध्ये भारत आणि अमेरिकेमधील संबंध मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे हे भाषण महत्त्वाचे ठरणार आहे, असे अघी यावेळी म्हणाले.
USISPF : तिसऱ्या शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी संबोधित करणार - यूएस-इंडिया वीक
सोमवारी सुरू झालेली ही परिषद आठवडाभर चालणार आहे. "यूएस-इंडिया वीक : नेव्हिगेटिंग न्यू चॅलेंजेस" असे या परिषदेचे नाव आहे. या परिषदेच्या सोमवारच्या सत्रात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनीही सहभाग नोंदवला होता. तसेच मंगळवारच्या सत्रात रेल्वे मंत्री तसेच, वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सहभाग नोंदवला होता.

या शिखर परिषदेला जगातील मोठमोठे कॉर्पोरेट लीडर, सरकारी अधिकारी आणि नेते यांचा सहभाग असतो. या परिषदेमध्ये द्विपक्षीय सहकाराबाबत चर्चा केली जाते. व्यापार आणि गुंतवणूक, सामरिक उर्जा संबंध तसेच जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारताची स्थिती याबाबत परिषदेमध्ये चर्चा होते. यासोबतच फिनटेक, आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञानासंबंधीही यात चर्चा केली जाते.