महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

हैतीचे राष्ट्राध्यक्ष ज्वनेल मोइसे यांची हत्या; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या सहवेदना - ज्वनेल मोइसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैतीचे राष्ट्राध्यक्ष ज्वनेल मोइसे यांच्या हत्येबद्दल आणि प्रथम महिला मार्टिन मोईस यांच्यावरील हल्ल्याबाबत दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी टि्वट करून शोक व्यक्त केला.

Jovenel Moise -Modi
ज्वनेल मोइसे-मोदी

By

Published : Jul 9, 2021, 12:54 PM IST

पोर्ट ओ प्रिन्स - हैतीचे राष्ट्राध्यक्ष ज्वनेल मोइसे यांची हत्या करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैतीचे राष्ट्राध्यक्ष ज्वनेल मोइसे यांच्या हत्येबद्दल आणि प्रथम महिला मार्टिन मोइस यांच्यावरील हल्ल्याबाबत दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी टि्वट करून शोक व्यक्त केला.

हैतीचे राष्ट्राध्यक्ष ज्वनेल मोइसे यांची हत्या आणि प्रथम महिला मार्टिन मोइस यांच्यावरील हल्ल्याच्या वृत्ताने दुःख झाले. ज्वनेल मोइसे यांचे कुटुंबीय आणि हैतीच्या नागरिकांप्रती मी सवेंदना व्यक्त करतो, असे टि्वट पंतप्रधान मोदींनी केले.

अज्ञात व्यक्तींच्या गटाने मध्यरात्री हैतीचे अध्यक्ष ज्वनेल मोइसे यांची खासगी निवासस्थानी गोळ्या घालून हत्या केली. बुधवारी रात्री एकच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. हैतीच्या फर्स्ट लेडी मार्टिन मोईज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अंतरिम पंतप्रधान क्लेड जोसेफ यांनी लोकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रध्यक्षाची हत्या देशातील राजकीय अस्थिरतेच्या दरम्यान झाली. या वर्षाच्या सुरूवातीस हैतीमध्ये सरकारविरोधी निदर्शने झाली होती. यापूर्वीही मोइसे यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. ही माहिती खुद्द अध्यक्ष मोइसे यांनी दिली होती. आपल्याला ठार मारण्याचा कट रचला जात असल्याचे ते म्हटले होते.

हैतीवर आर्थिक, राजकीय आणि सामाजिक संकट घोघांवत आहे. देशात महागाईत वाढत असून अन्न आणि इंधनचीही कमतरता आहे. येथील 60 टक्के लोकांची दिवसाला दोन डॉलर्सपेक्षा कमी मिळकत आहे. 2010 मध्ये झालेल्या भूकंप आणि 2021 च्या चक्रीवादळातून देश सावरण्याचा प्रयत्न करीत आहे.

कुठे आहे हैती देश -

हैती हा देश कॅरिबियन समुद्रातील हिस्पॅनियोला बेटाच्या पश्चिम भागात आहे. हैतीच्या पूर्वेला डॉमिनिकन प्रजासत्ताक हा देश आहे. हैती ग्रेटर अँटिल्सचा भाग आहे. पोर्ट औ प्रिन्स ही हैतीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हैतीतील फक्त 45 टक्के नागरिक साक्षर असून या देशाची शासकीय भाषा फ्रेंच आहे. हैती हा स्वातंत्र्य मिळालेला लॅटिन अमेरिकेतील सर्वात पहिला देश होता. या देशाला इ.स. 1804 मध्ये फ्रेंचांच्या वसाहतींकडून स्वातंत्र्य मिळाले. येथील लोकसंख्येपैकी बहुतांश लोक निग्रो आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details