न्युयॉर्क - पंतप्रधान मोदी शनिवारी अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे पोहचले. पंतप्रधान 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत. ह्युस्टनमधील एनजीआर फुटबॉल स्टेडिअमवर हा कार्यक्रम होणार आहे. भारतीय अमेरिकी नागरिकांनी या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून ५० हजारांपेक्षा जास्त लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
#HowdyModi LIVE : पंतप्रधान मोदी अमेरिकेला रवाना, एनजीआर स्टेडियम मोदींच्या स्वागताला सज्ज - एनजीआर फुटबॉल स्टेडिअम
पंतप्रधान मोदी शनिवारी अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे पोहचले. पंतप्रधान 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत.
LIVE UPDATE -
- बोहरा समुदायाने पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
- शीख समुदायाने ह्युस्टन येथे पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
- पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील कश्मीरी पंडीतांची भेट घेतली. यावेळी ७ लाख काश्मीरी पंडीतांच्या वतीने काश्मीरी समुदायाने मोदींचे आभार मानले.
- अमेरिकन तेल कंपनी टेलुरीयन आणि भारतीय कंपनी पेट्रोनेट यांच्याचत सामंजस्य करार झाला. ५० लाख टन नैसर्गिक वायू संदर्भात करार झाला.
- पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील उर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. गुंतवणुकीविषयी चर्चा
- अमेरिकेच्या व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक ख्रिस्तोफर ओलसन यांनी मोदींचे ह्युस्टन विमानतळावर स्वागत केले
ह्युस्टनमधील भारतीय लोकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. मोदी ह्युस्टनल येण्याआधी शहरामध्ये एक कार रॅलीही काढण्यात आली. यामध्ये २०० पेक्षा जास्त कार सहभागी झाल्या होत्या. 'टेक्सास इंडिया फोरम'ने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीड हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक काम करत आहेत. ३ आठवड्यांच्या आत या कार्यक्रमाचे बुकिंग फुल्ल झाले आहे. भारत अमेरिका संबंध अधिक दृढ होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अमेरिकेच्या व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक ख्रिस्तोफर ओलसन यांनी मोदींचे ह्युस्टन विमानतळावर स्वागत केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या दौऱ्यावेळी मोदी तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेणार आहेत. तसेच एनजीआर स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमापूर्वी स्थानिक प्रतिनिधींशी मोदी चर्चा करणार आहेत. त्यानंतर मोदी न्युयॉर्कला प्रस्थान करणार आहेत.
२३ सप्टेंबरला मोदी संयुक्त राष्ट्रामध्ये 'क्लायमेट अॅक्शन समिट' या बैठकीला उपस्थिती लावणार आहेत. आठ दिवसांच्या या दौऱ्यात मोदींचे वेळापत्रक विविध कार्यक्रमांनी भरुन गेले आहे. उद्योग जगतातील प्रतिनिधींशी मोदी चर्चा करणार आहेत. तसेच सुंयुक्त राष्ट्राच्या आमसभेवेळी अनेक देशांच्या प्रमुखांशी मोदी चर्चा करणार आहेत.