महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'या' कारणामुळे नरेंद्र मोदी चांगल्या सध्या चांगल्या 'मूड'मध्ये नाहीत - डोनाल्ड ट्रम्प - Trump on border dispute between India and China

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्याच्या घडीला चीनबाबत मोदी 'चांगल्या मूड'मध्ये नसल्याचं वक्तव्य केलं.

अमेरिका राष्ट्राध्यक्ष
अमेरिका राष्ट्राध्यक्ष

By

Published : May 29, 2020, 11:18 AM IST

वॉशिंग्टन डी.सी -भारतीय लष्कर आणि चिनी सैन्यामध्ये (पीएलए) डेमचोक, लद्दाखमधील गलवान व पँगॉन्ग आणि उत्तर सिक्कीम येथील नाकु ला येथील विविध सेक्टर्सजवळ तणाव निर्माण झाला आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्याच्या घडीला चीनबाबत मोदी 'चांगल्या मूड'मध्ये नसल्याचं वक्तव्य केलं.

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला आहे. चीनसोबत सुरु असणाऱ्या या मतभेदांमुळे मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत' असं ट्रम्प गुरुवारी ओव्हल ऑफिसमध्ये म्हणाले.

भारत आणि चीन यांच्यात संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांची लोकसंख्या सुमारे 1.4 अब्ज आहे. दोन्ही देशांच्या सैन्यही खूप शक्तिशाली आहेत. या सीमा वादामुळे भारत आनंदी नसून याबाबत चीनही आनंदी नसल्याची शक्यता आहे, असे ट्रम्प म्हणाले. शक्य आहे की, चीनसुद्धा आनंदी नाही. दरम्यान ट्रम्प यांनी बुधवारी भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये मध्यस्ती करण्यासासंबधी इच्छा दर्शवणारे टि्वट केले होते.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांच्या माहितीनुसार दोन्ही राष्ट्रांच्या वतीनं या मुद्द्यावर चर्चा सुरु आहेत. परिणामी सीमावादाचा हा मुद्दा चर्चेनेच निकाली निघेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

सध्याच्या घडीला विवादास्पद एलओएसीवरील सैन्याचा स्तर नेहमीपेक्षा खूप उच्च आहे आणि माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार पूर्व लडाखमधील पनगोंग सरोवराच्या उत्तरेकडील किनारा आणि गलवान नदीच्या खोऱ्यासह ५ ठिकाणांवर १,२०० ते १,५०० पीएलएचे सैनिक डोळ्याला डोळा भिडवून उभे आहेत. परंतु भारत किंवा चीनने प्रक्षोभक किंवा आक्रस्ताळेपणाचे मानले जाईल, असे कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details