न्युयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये आज (मंगळवार) पुन्हा एकदा बैठक होणार आहे. ह्युस्टन येथे आयोजित 'हाऊडी मोदी कार्यक्रमामध्ये एकत्र आल्यानंतर ३६ तासांच्या आत दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा बैठक होणार आहे. दोन्ही नेत्यांमध्ये विविध महत्त्वाच्या मुद्द्यांसह दहशतवादावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीनंतर संयुक्त राष्ट्रामध्ये उभारण्यात आलेल्या सोलार पार्कचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या इमारतीमध्ये भारताने स्व:खर्चाने सोलार प्रकल्प उभारला आहे. त्यानंतर मोदींना 'ग्लोबल गोलकिपर अवार्ड'ने सन्मानित करण्यात येणार आहे. बिल अॅड मेलिंडा गेटस् फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार मोदींना देण्यात येणार आहे.