वॉशिंग्टन डीसी - अमेरिकेतील साऊथ डिकोटा राज्यामध्ये विमान अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये २ बालकांचाही समावेश आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना स्थानिक वेळेनुसार शनिवारी दुपारी घडली.
हेही वाचा - तेलंगाणामध्ये प्रशिक्षणासाठी उड्डान घेतलेल्या विमानाचा अपघात; २ वैमानिकांचा मृत्यू
चेंबर्लिन विमानतळावरून हे विमान इदाहो फॉल्स शहराकडे जात होते. मात्र, उड्डान घेतल्यानंतर दुपारी १२ वाजता अचानक विमान कोसळले, अशी माहिती नॅशनल ट्रान्सपोर्टेशन दिली. खराब हवामानामुळे विमान कोसळल्याची माहिती मिळत आहे. जखमींना सिओक्स येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - अमेरिकेत दुसऱ्या महायुद्धच्या काळातलं जुनाट बॉम्बर विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू
याआधी अमेरिकेत दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील एक जुनाट बॉम्बर विमान ३ ऑक्टोबरला कोसळले होते. बोईंग कंपनीचे बी - १७ हे व्हिन्टेज विमान कोसळल्याने ७ जणांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेतल्या कनेटिकेट येथील ब्रडली आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड होत असताना हे विमान अपघातग्रस्त झाले होते. त्यानंतर पुन्हा विमान कोसळण्याची दुर्घटना अमेरिकेमध्ये घडली आहे.