वॉशिंग्टन डी.सी - अमेरिकेत बायडेन पर्वाला सुरुवात झाली आहे. जो बायडेन यांनी अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. बायडन यांच्या मंत्रिमंडळात विविध घटकांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. त्यांच्या कॅबिनेट मंत्रीमंडळामध्ये 38 वर्षीय पीट बटइग यांची निवड झाली आहे. बायडेन यांच्या कॅबिनेटमधील ते पहिले एलजीबीटीक्यू सदस्य बनले आहेत. तसेच व्हाईट हाऊसच्या मंत्रीमंडळामधील ते पहिले समलैंगिक सदस्य बनले आहेत.
पीट बटइग यांची अमेरिकेच्या सिनेटमध्ये परिवहन सचिव पदी नियुक्ती करण्यासाठी मतदान घेण्यात आले. यावेळी त्यांच्या बाजूने 86 तर विरोधात 13 मते पडली. ते 19 वे परिवहन सचिव आणि राष्ट्रपती जो बायडेन यांच्या मंत्रीमंडळातील पाचवे सदस्य आहेत. सीनेटद्वारे त्यांच्या नावाची औपचारीक घोषणा अद्याप बाकी आहे.