महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई होण्याची शक्यता - कॅपिटॉल हिल इमारतीवर ट्रम्प समर्थकांचा गोंधळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा महाभियोगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संसदेवरील ट्रम्प समर्थकांच्या हिंसाचारानंतर अमेरिकेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प

By

Published : Jan 9, 2021, 1:50 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा महाभियोगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संसदेवरील ट्रम्प समर्थकांच्या हिंसाचारानंतर अमेरिकेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून डेमोक्रॅटीक पक्षाचे नेते आक्रमक झाले असून ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यावर मत व्यक्त करणे टाळले आहे.

लष्करप्रमुखांशी सभागृह अध्यक्षांची चर्चा -

ट्रम्प यांनी अवैध आणि बेकायदेशीर पावले उचलल्याचा ठपका संसद सदस्यांनी ठेवला आहे. अमेरिकन संसदेतील 'हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह'च्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ट्रम्प यांनी तत्काळ राजीनामा दिला नाही तर सभागृह त्यांच्यावर महाभियोगाची कारवाई करेल, असा इशार त्यांनी राष्ट्राध्यक्षांना दिला आहे.

अणू शस्त्रांचा गैरवापर होण्याची चिंता-

नॅन्सी पेलोसी यांनी अमेरिकेच्या लष्कर प्रमुखांशीही चर्चा केली आहे. ट्रम्प यांच्याकडून अणू शस्त्रांचा गैरवार होऊ शकतो का? ही चिंता त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांकडे आण्विक शस्त्रे आणि हल्ल्याचा आदेश देण्याचे सर्वाधिकार आहेत. या अधिकारांचा गैरवापर होऊ नये म्हणून पेलोसी यांनी लष्करप्रमुख मार्क मेली यांच्याशी चर्चा केली. मेली यांनी असे काही होणार नसल्याचे आश्वस्त केल्याचे पेलोसी यांनी सांगितले.

संसदेवरील हल्ल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया -

राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपेपर्यंत डोनाल्ड ट्रम्प काही चुकीचे पाऊल उचलू शकतात, अशी भीती काही नेते व्यक्त करत आहेत. संसदेवर हल्ला करणाऱ्यांना ट्रम्प यांनी 'व्हेरी स्पेशल' असे संबोधले होते. या हिंसाचाराला ट्रम्प जबाबदार असून त्यांनी आंदोलकांना भडकावल्याचा आरोप होत आहे. काही आक्षेपार्ह ट्विटमुळे त्यांचे अकाऊंटही बंद करण्यात आले आहे. सोबतच फेसबुक आणि इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांच्या वैयक्तिक अकाऊंटवर कारवाई केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details