वॉशिंग्टन -जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसें दिवस वाढतच आहे. अमेरीकेत आत्तापर्यंत १३ हजार लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये २०० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली आहे.
अमेरिकेत १३ हजार लोकांना कोरोनाची लागण, आत्तापर्यंत २०० जणांचा मृत्यू - आत्तापर्यंत २०० जणांचा मृत्यू
अमेरिकेत आत्तापर्यंत १३ हजार लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये २०० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली आहे.
जॉन हापकिन विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी ९ हजार ३४५ लोकांना कोरोनाची लागण झाली होती, तर १५० जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, आज (शुक्रवार) हे प्रमाण १३ हजार पर्यंत गेले असून, २०० जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. सर्वात जास्त मृत्यूचे प्रमाण हे वॉशिंग्टनमध्ये आहे. तेथे आत्तापर्यंत ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. हे चित्र विदारक असून, दिवसें दिवस हे प्रमाण वाढत असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दिलेल्या माहितीनुसार जगभरात २ लाख ४० हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत जगात ९ हजार ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे.