महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

वाद पेटला.. इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळावर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला - Pompeo on Iraqi attack

इराकमधील अमिरेकी लष्करी तळावर रविवारी पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पेओ यांनी टि्वट करून हल्ल्यांचा निषेध व्यक्त केला.

माईक पोम्पेओ
माईक पोम्पेओ

By

Published : Jan 13, 2020, 9:24 AM IST

वॉशिंग्टन डी सी - इराकमधील अमेरिकी लष्करी तळावर रविवारी पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पेओ यांनी टि्वट करून हल्ल्यांचा निषेध व्यक्त केला. इराक सरकारने हल्लेखोरांवर कारवाई करावी, असे पोम्पेओ यांनी टि्वट करून म्हटले.

इराकमधील एका लष्करी तळावर रविवारी पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला झाला. यामध्ये इराकचे चार जवान जखमी झाले आहेत. बगदादच्या उत्तरेकडील भागात असणाऱ्या हवाई तळावर काही अमेरिकी जवान प्रशिक्षण घेत होते. याठिकाणीच हा हल्ला झाल्याची माहिती आहे.

इराकच्या एफ-१६ या विमानांच्या ताफ्याचे मुख्य हवाई तळ हे अल-बलाद आहे. इराकने ही विमाने अमेरिकेकडूनच घेतली होती. या तळावर अमेरिकेचे बरेच लष्करी अधिकारी होते. मात्र, अमेरिका आणि इराणमधील तणाव पाहता, त्यांपैकी कितीतरी अधिकाऱ्यांना येथून हलवण्यात आले होते. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेथे केवळ १५ अमेरिकी सैनिक आणि केवळ एक लढाऊ विमान होते.

लष्करी अधिकारी कासीम सुलेमानीला अमेरिकेने रॉकेट हल्ल्यात ठार केल्यानंतर इराणने याचा बदला घेण्याचा निर्धार केला आहे. तर इराणने जर परदेशातील अमेरिकेचे नागरिक किंवा मालमत्तेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका इराणमधील ५२ महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करेल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. दोन्ही देशातील वाद पेटण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details