महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Omicron Variant : जाणून घ्या ओमिक्रॉन व्हॅरिएन्टविषयीची माहिती, एका क्लिकवर - कोरोनाचा नवा प्रकार

दक्षिण आफ्रिकेत(South Africa) आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन(Omicron Variant) या नव्या व्हॅरिएन्टची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. या विषाणूविषयी WHO ने 26 नोव्हेंबर रोजी काही माहिती जारी केली. त्यानुसार या व्हॅरिएन्टला WHO ने व्हायरस ऑफ कन्सर्न(VOC) म्हणजेच काळजी करण्याजोगा विषाणू ठरविले आहे.

Omicron Varient collage image
Omicron Varient collage image

By

Published : Nov 28, 2021, 12:39 PM IST

Updated : Nov 28, 2021, 2:33 PM IST

जिनिव्हा : दक्षिण आफ्रिकेत(South Africa) आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन(Omicron Variant) या नव्या व्हॅरिएन्टची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. या विषाणूविषयी WHO ने 26 नोव्हेंबर रोजी काही माहिती जारी केली. त्यानुसार या व्हॅरिएन्टला WHO ने व्हायरस ऑफ कन्सर्न(VOC) म्हणजेच काळजी करण्याजोगा विषाणू ठरविले आहे.

24 नोव्हेंबर रोजी झाले निष्पन्न

कोरोनाचा 'B.1.1.529' हा नवीन प्रकार म्हणजेच व्हॅरिएन्ट दक्षिण आफ्रिकेत आढळून आल्याचे सर्वप्रथम 24 नोव्हेंबर 2021 रोजी निष्पन्न झाले. ज्या नमुन्यांमध्ये हा व्हॅरिएन्ट निष्पन्न झाला ते नमुने 9 नोव्हेंबर 2021 रोजी गोळा करण्यात आले होते.

अनेक म्युटेशन्स आढळल्याने चिंता

या विषाणूत मोठ्या प्रमाणात म्युटेशन्स म्हणजेत बदल झाल्याचे दिसून आले आहेत. यातील काही बदल हे चिंताजनक आहेत. इतर चिंताजनक व्हॅरिएन्टच्या तुलनेत या व्हॅरिएन्टच्या माध्यमातून रिइन्फेक्शनचा धोका वाढल्याचे प्राथमिक पुराव्यांतून दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जवळपास सर्वच प्रांतांमध्ये या व्हॅरिएन्टचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.

व्हॅरिएन्टविषयी संशोधन सुरू

सध्या या व्हॅरिएन्टविषयी वेगवेगळे संशोधन केले जात असून या माध्यमातून त्याच्याविषयीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. या संशोधनाचे निष्कर्ष डब्ल्यूएचओकडून सदस्य राष्ट्र आणि जनतेसाठी सार्वजनिक केले जातील.

TAG-VE ने WHO ला दिला सल्ला

SARS-CoV-2 व्हायरस इव्होल्युशनवरील तांत्रिक सल्लागार समूह म्हणजेच TAG-VE ने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या विषाणूला काळजी करण्याजोगा विषाणू ठरविले जावे असा सल्ला दिला आहे. त्यानुसार डब्ल्युएचओने या विषाणूला काळजी करण्याजोगा विषाणू म्हणजेच व्हायरस ऑफ कन्सर्न(VOC) ठरविले आहे. WHO ने B.1.1.529 या व्हॅरिएन्टला ओमिक्रोन (Omicron) असे नाव दिले आहे.

Last Updated : Nov 28, 2021, 2:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details