सॅन फ्रान्सिस्को - अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमधील प्राणिसंग्रहालयात राहत असलेला सर्वात जुना नर चिंपांझीचा मृत्यू झाला आहे. तो 63 वर्षांचा होता. चिंपांझीचे नाव ‘कोबी’ असे होते. कोबीच्या निधनानंतर प्राणिसंग्रालयातील अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला.
चिंपांझी ‘कोबी’ ला 1960 च्या दशकात सॅन फ्रान्सिस्कोमधील प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले होते. तेव्हापासून त्याची देखभाल करण्यात येत होती. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, वृद्धापकाळाने त्याचा मृत्यू झाला असावा, असे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.