वॉशिंग्टन डी.सी -अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. पेंटागनजवळील एका सब-वे स्टेशनमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती. परिसरात हल्लेखोर सक्रिय असल्याची माहिती मिळताच लॉकडाऊन करण्यात आलं होतं. हल्लेखोराने चाकूने वार केल्यानंतर एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी संशयित आरोपीला ठार केल्याचे वृत्त आहे. परिसरात तणाव निर्माण झाला असून लोकांना नागरिकांना दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अर्लिंग्टन काउंटी फायर डिपार्टमेंटनुसार अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्याप हे स्पष्ट नाही, की गोळी लागल्यामुळेच दाखल केले आहे. ही घटना मेट्रो बस प्लेटफार्मवर झाल्याचे पेंटागॉन फोर्स प्रोटेक्शन एजन्सीने सांगितले. ही जागा अर्लिंग्टन काउंटीमध्ये आहे. वृत्तसंस्थेच्या पत्रकारने पोलिसांना 'शूटर' बोलताना ऐकल्याची माहिती आहे.