वॉशिंग्टन - लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्या व काट्याची टक्कर ठरलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. त्यांच्या विजयावर अंतिम शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. विजय समीप दिसत असताना जो बायडेनची राजकीय टीम अंतिम निकाल येण्यापूर्वीच कामाला लागली आहे.
बायडेन यांनी शुक्रवारी विलमिंगटनमध्ये म्हटले की, राष्ट्राध्यक्षाच्या रुपाने त्यांची जबाबदारी आहे, की संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणे. बायडेन यांनी जनतेला आवाहन केले की, विभाजनाची बीजे रुजवणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. परिवर्तनासाठी रेकॉर्ड मतदान झाले असून आम्ही विजयाच्या उंबरठ्यावर आहे. आम्ही नेवादामध्ये पुढे तर पेन्सिलवेनियामध्ये पिछाडीवर आहे. मी मागील २४ वर्षांपासून एरिझोनामध्ये विजय मिळणारा पहिला डेमोक्रेटिक आहे. लोकांनी हवामान बदलासंदर्भात मतदान केले आहे
पहिल्या दिवसांपासून काम करण्याची योजना -