वॉशिंग्टन डी.सी - राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक एलेक्सी नवलनी यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे कोणतेही पुरावे अमेरिकेला अद्याप सापडले नाहीत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. याप्रकरणामध्ये अमेरिका सरकारचे पूर्ण लक्ष आहे, असेही ते म्हणाले.
नवलनी यांना विषबाधा झाल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही : ट्रम्प - एलेक्सी नवलनी
राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक एलेक्सी नवलनी यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे कोणतेही पुरावे अमेरिकेला अद्याप सापडले नाहीत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
एलेक्सी नवलनी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. नवलनी सध्या कोमामध्ये आहेत. एलेक्सी नवलनी यांना ठार मारण्याचा प्रयत्नाचा नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी निषेध केला. तसेच याप्रकरणी तपास करत असलेल्या आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांना रशिया सरकारने उत्तरे द्यावीत, असे ते म्हणाले.
एलेक्सी नवलीन हे रशियामधील सरकारला विरोध करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. गेल्या वर्षी एलेक्सी नवलनी यांना तुरुंगवास झाला होता. तेव्हा त्यांना विषबाधा झाली होती. मात्र, डॉक्टरांनी अॅलर्जिटीक अटॅक असल्याचे सांगून पुन्हा तुरुंगात पाठवलं होतं. त्यानंतर पुन्हा एलेक्सी सायबेरियावरुन मॉस्कोला परत येत असतानाच विमानामध्ये त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटलं जात आहे.