वॉशिंग्टन डी. सी. - कॅन्सरग्रस्त रूग्णांच्या उपचारासाठी प्रामुख्याने केमोथेरेपीचा वापर केला जातो. ही उपचार पद्धती इतकी त्रासदायक आहे की, काही रूग्ण उपचार अर्ध्यातच सोडून देतात. मात्र, कॅन्सर रूग्णांसाठी एक आनंदाची बातमी संशोधकांकडे आहे.
जेरूसलेम मधील हिब्रू विद्यापीठातील काही संशोधकांनी केमोथेरेपीची औषधे देण्यासाठी एक नवीन आणि कमी त्रासदायक पद्धत शोधून काढली आहे. रूढ उपचार पद्धतीमध्ये केमोथेरेपीचे उपचार करताना कॅन्सरग्रस्त पेशींसोबतच शरीरातील इतर पेशींवर देखील औषधांचा मारा केला जातो. त्यामुळे रुग्णाला प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात.