वॉशिंग्टन डी. सी -कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी जगभरामध्ये व्हेंटिलेटरचा तुटवडा भासत आहे. यावर उपाय म्हणून नासाच्या तंत्रज्ञांनी अल्प किमतीत व्हेंटिलेटर बनविले आहे. कोरोना रुग्णांवर खास करून उपचार करण्यासाठी उच्च दाब तंत्रज्ञान असणारे व्हेंटिलेटर तयार केले आहे.
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी नासाने बनवलं अल्प दरात व्हेंटिलेटर - ow-cost ventilator
या व्हेंटिलेटरला 'व्हायटल' असे नाव देण्यात आले आहे. 'व्हेंटिलेटर इंटरव्हेन्शन टेक्नॉलॉजी अॅक्सीसीबल लोकली' असे या व्हेंटिलेटरचे पूर्ण नाव आहे. या व्हेंटिलेटर सर्व प्रमाण चाचण्यांत पास झाले आहे.
या व्हेंटिलेटरला 'व्हायटल' असे नाव देण्यात आले आहे. व्हेंटिलेटर इंटरव्हेन्शन टेक्नॉलॉजी अॅक्सीसीबल लोकली असे या व्हेंटिलेटरचे पूर्ण नाव आहे. हे व्हेंटिलेटर सर्व प्रमाण चाचण्यांत पास झाले आहे. आता अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून या व्हेंटिलेटरचा आढावा घेतला जात आहे. त्यानंतर आणीबाणीच्या परिस्थितीत त्याच्या वापराला परवानगी देण्यात येणार आहे.
कोरोनाची सर्वसाधारण लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर या व्हेंटिलेटरद्वारे उपचार करण्यात येणार आहे. तर इतर व्हेंटिलेटर तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणार आहे. इतर व्हेंटीलेटरपेक्षा व्हायटल या व्हेंटिलेटरची निर्मिती करण्यासही खूप कमी वेळ लागतो, असे नासाने सांगितले.