केप कार्निवल - अमेरिकेच्या अवकाश संशोधन विभागाने (नासा) आगामी चांद्र मोहीमेसाठी अठरा अंतराळवीरांची नावे जाहीर केली आहे. 'अर्तिमीस (Artemis) मून लँडींग प्रोग्राम' असे या मोहीमेस नाव देण्यात आले आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात अंतराळवीरांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
महिला पहिल्यांदाच ठेवणार चंद्रावर पाऊल -
चंद्रावर पहिल्यांदाच या मोहिमेद्वारे महिला पाऊल ठेवणार आहे. तर पुरुषही पुन्हा एकदा चंद्रावर जाणार आहे. या अठरा अंतराळवीरांच्या गटातून त्यांची निवड केली जाणार आहे. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथे हा कार्यक्रम झाला. १९६० आणि ७० च्या दशकात अमेरिकेने अपोलो मिशनद्वारे चंद्रावर स्वारी केली होती. आता पुन्हा २०२४ साली चंद्रावर जाण्यासाठी नासा काम तयारी करत आहे.