महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'ब्लॅक लाईव्ज मॅटर' : मुलांच्या संरक्षणासाठी बोस्टनमधील रॅलीमध्ये शेकडो मातांची हजेरी - 'मार्च लाईक मदर फॉर ब्लॅक लाईव्ज'

आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी बोस्टन येथे शनिवारी शेकडो माता आणि निवडून आलेल्या अधिकाऱ्यांनी रॅलीला हजेरी लावली. 'मार्च लाईक मदर फॉर ब्लॅक लाईव्ज' हा उपक्रम शांततेत शांततेत आयोजित करण्यात आला.

ब्लॅक लाईव्ज मॅटर
ब्लॅक लाईव्ज मॅटर

By

Published : Jun 28, 2020, 11:46 AM IST

बोस्टन - कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या दुर्दैवी आणि अन्यायकारक मृत्यूबद्दल अमेरिकेमध्ये कोरोना विषाणू ऐवजी वर्णद्वेष हे मोठे संकट असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी बोस्टन येथे शनिवारी शेकडो माता आणि निवडून आलेल्या अधिकाऱ्यांनी रॅलीला हजेरी लावली. 'मार्च लाईक मदर फॉर ब्लॅक लाईव्ज' हा उपक्रम शांततेत शांततेत आयोजित करण्यात आला.

जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा माईनपोलीस याठिकाणी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत मोर्चे सुरू झाले आहेत. जॉर्जला अटक करत असताना, एक पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर 8 मिनिटे 48 सेकंद गुडघा ठेवला होता. जॉर्ज त्याला तो गुडघा काढण्यासाठी आर्जव करीत होता, "मला श्वास घेता येत नाही, कृपया माझा जीव घेऊ नका," असे जॉर्ज म्हणत होता. मात्र, पोलिसाने त्याच्या विनवण्या ऐकल्या नाहीत, आणि जॉर्जचा मृत्यू झाला.

जॉर्ज फ्लॉईड प्रकरणामुळे अमेरिका धुमसत आहे. जॉर्ज यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा मिनियापोलिसमधील लोकांच्या सुरक्षिततेवरही प्रश्न उपस्थित झाला आहे. अमेरिकेत पोलिसांच्या आणि देशातील एकूणच वर्णभेदाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले, आणि एका मोठ्या आंदोलनाला सुरूवात झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details