वॉशिंग्टन - अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या 8 लाख 50 हजारहून अधिक झाली आहे. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशनच्या नव्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत.
वृत्तसंस्था सिन्हुआनुसार, गेल्या आठवड्यात 22 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत एकूण 61 हजार 447 नवीन लहान मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता, तेव्हापासूनचे सर्वाधिक आहे, असे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा -न्यूयॉर्कमधील विमानतळांवर मास्क न घातल्यास होणार 50 डॉलर्सचा दंड