वॉशिंग्टन डी. सी - जगभरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 25 लाखांपेक्षा जास्त झाला आहे. तर 1 लाख 74 हजार 415 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 6 लाख 65 हजार रुग्ण पूर्णत बरे झाले आहेत.
जगभरात 25 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित; अमेरिकेत 8 लाखांपेक्षा जास्त 'पॉझिटिव्ह' - कोरोना जागतिक आकडेवारी
अमेरिकेत आठ लाखांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर 43 हजार 495 रुग्ण दगावले आहेत. कोरोनाचा सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला आहे.
![जगभरात 25 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित; अमेरिकेत 8 लाखांपेक्षा जास्त 'पॉझिटिव्ह' file pic](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6887763-603-6887763-1587491314769.jpg)
अमेरिकेत आठ लाखांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर 43 हजार 495 रुग्ण दगावले आहे. कोरोनाचा सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेखालोखाल स्पेनमध्ये 2 लाख रुग्ण आढळून आले आहेत. इटली, फ्रान्स, जर्मनी, इंग्लड, तुर्कस्तान, रशिया या देशांमध्येही कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत.
जगभरात 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेनंतर सर्वात जास्त फटका युरोपातील देशांना बसला आहे. भारतात कोरोनाग्रस्तांनी 18 हजारांचा टप्पा पार केला आहे. आत्तापर्यंत 18 हजार 601 रुग्ण आढळून आले असून 3 हजार 252 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सोमवारी दिवसभरात 705 जण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर 17.48 टक्के असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.