वॉशिंग्टन :डोनाल्ड ट्रम्प यांचा यंदाच्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाला आहे. या धक्क्यानंतर त्यांना आता आणखी एक धक्का बसणार आहे. मेलानिया या ट्रम्पना घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त अमेरिकेतील काही प्रसारमाध्यमे देत आहेत.
कॉन्ट्रॅक्ट मॅरेज..?
व्हाइट हाऊसमधील एका माजी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प आणि मेलानिया यांनी १५ वर्षांचे 'काँट्रॅक्ट मॅरेज' केले होते. या कराराची मुदत आता संपत आहे. त्यामुळे मेलानिया गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः मिनिट-मिनिट मोजत आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना घटस्फोट दिला असता, तर आपल्या अधिकारांचा वापर ट्रम्प यांनी आपल्या विरोधात केला असता, अशी भीती मेलानियांना वाटत होती. त्यामुळे घटस्फोट देण्यासाठी मेलानिया गेल्या कित्येक दिवसांपासून ट्रम्प व्हाइट हाऊसमधून बाहेर पडण्याची वाट बघत होत्या, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. बिझनेस टुडे या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.