महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

क्राईस्टचर्च हल्ल्यात मला दोषी ठरवण्यासाठी माध्यमे रात्रंदिवस कार्यरत - डोनाल्ड ट्रम्प - attack

"न्यूझीलंडमधील भयावह हल्ल्यासाठी मला दोषी ठरवण्यात खोट्या बातम्या पसरवणारी माध्यमे 'ओव्हरटाईम' करुन काम करत आहेत. ते सिद्ध करण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे. हे अत्यंत निंदनीय आहे," अशा शब्दात ट्रम्प यांनी माध्यमांचा समाचार घेतला आहे.

डोनाल्ड ट्रम्प

By

Published : Mar 20, 2019, 4:00 AM IST

वॉशिंग्टन डीसी - न्यूझीलंडमध्ये मागील आठवड्यात झालेल्या दोन ह्ल्ल्यांवरुन अमेरिकन प्रसार माध्यमे आपल्याला दोषी ठरवत असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ही बाब निंदनीय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

"न्यूझीलंडमधील भयावह हल्ल्यासाठी मला दोषी ठरवण्यात खोट्या बातम्या पसरवणारी माध्यमे 'ओव्हरटाईम' करुन काम करत आहेत. ते सिद्ध करण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे. हे अत्यंत निंदनीय आहे," अशा शब्दात ट्रम्प यांनी माध्यमांचा समाचार घेतला आहे.

दहशतवाद्यांनी आपल्या घोषणापत्रात ट्रम्प यांचा उल्लेख 'सुधारित सवर्णांची ओळख', असा केल्याचा दावा काही अमेरिकी माध्यमांनी केला आहे. किंबहुना, ट्रम्प गोऱ्यांच्या वर्चस्ववादी विचारधारेला पाठिंबा देत असल्याचा दावा व्हाईट हाऊसने फेटाळून लावला आहे.

"अध्यक्ष गोऱ्यांच्या वर्चस्ववादाचे समर्थक नाहीत. हे कितीदा सांगायला हवे?", अशी प्रतिक्रिया व्हाईट हाऊसचे कार्यप्रमुख मिक मुलवाने यांनी दिली.

यापूर्वी २८ वर्षीय दहशतवादी ब्रेंटन टॅरंट याच्याशी संबंधित असलेल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक लांबलचक घोषणापत्र जाहीर करण्यात आले होते. यामध्ये स्थलांतर विरोधी आणि मुस्लीम विरोधी मते प्रदर्शित करण्यात आली होती. "आमचा ट्रम्प यांना सुधारित सवर्णांची ओळख आणि समान हेतू असलेले म्हणून पाठिंबा आहे. परंतु धोरण निर्माता आणि नेता म्हणून पाठिंबा नाही", असे या घोषणापत्रात टॅरंट याने स्पष्ट केले आहे.

टॅरंटने न्यूझीलंडमधील क्राईस्टचर्च येथील अल नूर आणि आणि लिनवूड या मशीदींवर १५ मार्चला हल्ला केला. यामध्ये ५० नागरिकांचा बळी गेला. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेचे फेसबुक लाईव्हही टॅरंटने केले होते. त्याला ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details