न्यूयॉर्क - अमेरिकेमध्ये अंदाधुंद गोळीबाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. न्यूयॉर्क शहरामधील ब्रुकलीन भागामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३ जण जखमी झाले आहेत.
शनिवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार ७ च्या दरम्यान गोळीबार झाल्याच्या वृत्ताला न्यूयॉर्क पोलीस विभागाच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे. ब्रुकलीनमधील '७४ युटीका एव्हेन्यू' येथील क्राऊन हाईट परिसरामध्ये ही घटना घडली. गोळाबारामागील कारण अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
हेही वाचा - अमेरिकेतील टेक्सास प्रांतात अंदाधुंद गोळीबार, २० जणांचा मृत्यू
जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोराची ओळख अद्याप पटली नसून पोलीसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
हेही वाचा - अमेरिकेत २४ तासांच्या आत अंदाधुंद गोळीबाराची दुसरी घटना, ओहायो प्रांतात १० ठार
अमेरिकेतील ओहायो प्रांतात ४ ऑगस्टला अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली होती. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये हल्लेखोराचाही मृत्यू झाला होता. ऑरेगॉन जिल्ह्यातील डायटॉन शहरात दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली होती. तसेच ऑगस्ट महिन्यात टेक्सास प्रांतामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये २० जणांना प्राण गमवावे लागले होते, तर २६ जण जखमी झाले होते.