महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

न्यूयॉर्क शहरात 14 मार्च हा कोविड-19 स्मृतिदिन म्हणून पाळला जाणार

शहरात कोविड-19 मुळे एकूण 25 हजार 99 मृत्यू झाले आहेत. या मृत्यू झालेल्यांपैकी 20 हजार 295 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निश्चित झाले होते. तर, मृत्यू झालेले इतर 4 हजार 804 लोक 'संभाव्य' कोविड-19 रुग्ण होते.

न्यूयॉर्क कोविड-19 स्मृतिदिन न्यूज
न्यूयॉर्क कोविड-19 स्मृतिदिन न्यूज

By

Published : Jan 1, 2021, 7:37 PM IST

न्यूयॉर्क -शहरात 14 मार्च हा कोविड-19 स्मृतिदिन म्हणून पाळला जाईल. गुरुवारी महापौर बिल डी ब्लासिओ यांनी याची घोषणा केली. कोरोना विषाणूमुळे पहिला मृत्यू 14 मार्च 2020 रोजी शहरात झाला. हा दिवस या विषाणूची लागण झाल्यामुळे मरण पावलेल्या सर्वांची आठवण करून देईल, यामुळे हा दिवस पाळण्यात येणार असल्याचे वृत्त वृत्तसंस्था सिन्हुआने दिले आहे.

शहरात कोविड-19 मुळे एकूण 25 हजार 99 मृत्यू झाले आहेत. या मृत्यू झालेल्यांपैकी 20 हजार 295 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निश्चित झाले होते. तर, मृत्यू झालेले इतर 4 हजार 804 लोक 'संभाव्य' कोविड-19 रुग्ण होते.

हेही वाचा -Covid 19 : ऑक्टोबरपासूनची ब्राझीलमध्ये 24 तासांत सर्वाधिक मृत्यूंची नोंद

डी ब्लासिओ म्हणाले की, सर्व पार्श्वभूमीतील लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. विशेषत: शहरातील गरीब अल्पसंख्याक भागात याचा अधिक परिणाम झाला.

वर्षाच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत शहराचे महापौर म्हणाले, 'असमानतेमुळेही बर्‍याच लोकांना जीव गमवावे लागले. अनेक लोक वर्णद्वेषाचे बळी ठरले.'

त्यांनी गुरुवारी ट्विट केले की, 'आमच्या शहरातील पहिला मृत्यू 14 मार्च 2020 रोजी कोरोनामुळे झाला होता. 14 मार्च 2021 रोजी आपण या साथीमुळे जीव गमावलेल्या सर्वांचे स्मरण केले पाहिजे.'

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अ‌ॅण्ड इंजिनीअरिंग आणि कोविड ट्रॅकिंग प्रोजेक्टच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी न्यूयॉर्क शहरातील कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 25 हजार 144 वर पोहोचली आहे आणि रुग्णांची संख्या 4 लाख 26 हजार 60 वर पोचली आहे.

हेही वाचा -नवीन कोरोना विषाणूचा शिरकाव झालेले फ्लोरिडा हे अमेरिकेतील तिसरे राज्य

ABOUT THE AUTHOR

...view details