वॉशिंग्टन - अमेरिकेच्या संसदेवर समर्थकांनी केलेला हल्ला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलाच भोवला आहे. अमेरिकेच्या संसदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग मंजूर करण्यासाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये संसदेच्या प्रतिनिधींनी महाभियोग मंजूर करण्यासाठी बहुमत दिल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच अमेरिकेच्या अध्यक्षांवर दुसऱ्यांदा महाभियोग संसदेच्या सभागृहात चालविण्यात आला. संसदेमध्ये महाभियोगाच्या प्रस्तावार चर्चा करण्यात आली. यावेळी २३२ विरोधात १९७ जणांनी महाभियोगाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. विशेष म्हणजे ट्रम्प यांचा पक्ष असलेल्या रिपब्लिकनच्या १० लोकप्रतिनिधींनीही महाभियोग मंजूर करण्याच्या बाजूने मत दिले. सिनेटमध्ये १९ जानेवारीला महाभियोगाच्या प्रस्तावावर मतदान घेतले जाणार आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल हिल इमारतीवर नुकतेच हल्लाबोल केला होता. यात चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अमेरिकेतील राजकीय वातावरण तापले आहे. डेमॉक्रॅटीक पक्षाने ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा खटला चालविण्याासाठी प्रस्ताव आणला होता. सशस्त्र हिंसाचार घडवून आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.