महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

जॉर्जिया आणि मिशिगनमध्ये ट्रम्पना धक्का; न्यायालयाने याचिका फेटाळल्या

असोसिएट प्रेस आणि फॉक्स न्यूज या दोन्ही वृत्तसंस्थांनी मिशिगनमध्ये बायडेन यांचा विजय झाल्याचा दावा केला होता. याठिकाणची मतमोजणी संपली नसतानाही असा दावा केल्यामुळे ट्रम्प यांनी याठिकाणच्या मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Major setback for Trump: Judges dismiss Trump claims in Georgia, Michigan
जॉर्जिया आणि मिशिगनमध्ये ट्रम्पना धक्का; न्यायालयाने याचिका फेटाळल्या..

By

Published : Nov 6, 2020, 11:07 AM IST

वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारयंत्रणेने बुधवारी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत पेन्सिल्व्हेनिया, मिशिगन आणि जॉर्जिया या तीन राज्यांमध्ये याचिका दाखल केल्या होत्या. यापैकी जॉर्जिया आणि मिशिगनमधील याचिका फेटाळण्यात आल्या आहेत.

असोसिएट प्रेस आणि फॉक्स न्यूज या दोन्ही प्रतिष्ठित वृत्तसंस्थांनी मिशिगनमध्ये बायडेन यांचा विजय झाल्याचा दावा केला होता. याठिकाणची मतमोजणी संपली नसतानाही असा दावा केल्यामुळे ट्रम्प यांनी याठिकाणच्या मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दुसरीकडे जॉर्जियामध्ये या दोघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला असून, ट्रम्प आघाडीवर असूनही बायडेन यांच्या विजयाची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे ट्रम्प यांनी याचिका दाखल केली होती. मात्र, या दोन्ही राज्यांमधील न्यायाधिशांनी ट्रम्प यांच्या याचिका फेटाळल्या आहेत.

पेन्सिल्व्हेनियामधील एक याचिका मान्य..

ट्रम्प यांनी पेन्सिल्व्हेनियामधील मतदान मोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासंबंधीची याचिकाही दाखल केली होती. तसेच, पेन्सिल्व्हेनियामध्ये मतदानाच्या दिवसानंतर तीन दिवसांपर्यंत आलेले बॅलेट मतमोजणीसाठी ग्राह्य धरण्यात यावे की नाही याबाबत सुरू असलेल्या खटल्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्नही ट्रम्प यांची प्रचारयंत्रणा करत होते.

यांपैकी मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची याचिका ट्रम्प यांच्या प्रचारयंत्रणेने दाखल केली होती. या याचिकेस मंजूरी मिळाली आहे. मात्र, त्याचवेळी पेन्सिल्व्हेनियामध्ये बॅलेटद्वारे होणारे मतदानही थांबणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :पॅरिस करारातून अमेरिका अधिकृतरित्या बाहेर

ABOUT THE AUTHOR

...view details