वॉशिग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन आणि सध्याचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी लढत होत आहे. या निवडणुकीमध्ये अमेरिकेच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त मतदानाची नोंद होईल, असा अंदाज बांधला जात आहे. आतापर्यंत ७.५ कोटी मतदारांनी मतदान केलेले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणि मतमोजणी प्रक्रिया कशी असते, जाणून घ्या सोप्या शब्दात...
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीला कोण उभे राहू शकतो, काय आहे अटी -
- अमेरिकेच्या घटनेनुसार राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार जन्माने अमेरिकेचा नागरिक असावा आणि त्याने अमेरिकेत किमान १४ वर्ष वास्तवाला असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे वय किमान ३५ वर्ष असावे.
अमेरिकेतील मुख्य पक्ष कोणते?
अमेरिकेत डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स हे दोन मोठे पक्ष आहेत. याशिवाय लिबर्टेरियन पार्टीचा कधी कधी तिसरा उमेदवार असतो. तर ग्रीन पार्टी आणि इंडिपेंडट पार्टी क्वचितच स्वतःचा चौथा उमेदवार उभा करतात.
असा ठरतो सार्वत्रिक निवडणुकीत विजय
अमेरिकेच्या निवडणूकीमध्ये पॉप्युलर व्होटने विजयी उमेदवार ठरत नाही तर ते ठरते इलेक्टोरल व्होटने. एकूण 538 मतांपैकी ज्याला 270 किंवा अधिक मते मिळतील तो राष्ट्राध्यक्षपदासाठी पात्र ठरतो. यामुळेच उमेदवारांसाठी काही राज्ये अतिशय महत्त्वाची ठरतात. कारण पॉप्युलर व्होट मिळवणं शक्यं झालं तरी इलेक्टोरल व्होटमध्ये हरण्याची शक्यता असते. प्रत्येक राज्यासाठी ठराविक इलेक्टोर्स असतात. काँग्रेसमध्ये या राज्याचे किती प्रतिनिधीत्व आहे त्यावर हे ठरते.
ही आहेत सर्वात जास्त इलेक्टोरल व्होट असलेली राज्ये -