वॉशिंग्टन - हत्या करण्यात आलेले पत्रकार जमाल खशोग्गीचा यांची तुर्की येथे राहणारी प्रेयसी हॅटिस सेनगिझ यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यावर खशोग्गी यांच्या हत्येचा आदेश दिल्याचा आरोप करत फिर्याद दाखल केली आहे.
हॅटिस सेनगिझ आणि खशोग्गी यांनी खशोग्गी यांच्या मृत्यूपूर्वी स्थापन केलेल्या डेमॉक्रसी फॉर अरब वर्ल्ड नाऊ (डॉन) ने मंगळवारी वॉशिंग्टन डीसीमध्ये फिर्याद दाखल केली.
फिर्यादीत खशोग्गीच्या मृत्यूमुळे सेनगिझ यांनी वैयक्तिक नुकसान व आर्थिक नुकसानीचा दावा केला आहे. तर, अधिकार समूहाने त्याच्या संचलनात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप केला आहे.
'या हत्येचा हेतू स्पष्ट होता, अरब जगतात लोकशाही सुधारणा घडवून आणण्यासाठी अमेरिकेत शिफारस करून लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार्या खशोग्गी यांना रोखणे,' असे एका वृत्तसंस्थेने या खटल्याच्या हवाल्याने म्हटले आहे.
'सौदी सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या खशोग्गी यांची मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशावरून हत्या करण्यात आली,' असे त्यात म्हटले आहे.