लॉस एंजिल्स -अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयड याची पोलिसांनी गळा दाबुन हत्या केल्यानंतर अनेक शहरांमध्ये आंदोलन उसळले आहे. आंदोलनाने अनेक ठिकाणी हिंसक वळणही घेतले आहे. या निदर्शनात केंड्रिक सॅम्पसन या अभिनेत्याने सहभाग घेतला असून पोलिसांच्या रबरी बुलेटने तो जखमी झाला आहे. आंदोलकांना पांगवत असताना लाठीहल्ल्यातही तो जखमी झाला आहे.
अभिनेता केंड्रिक सॅम्पसन आंदोलनात जखमी, जॉर्ज फ्लॉयडला न्याय देण्यासाठी अमेरिकेत मोठी निदर्शने - Black lives matter
आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठाचार्ज केला तसेच रबरी गोळ्याही झाडल्या. यातील एका गोळीने सॅम्पसन जखमी झाला आहे.
केंड्रिक सॅम्पसन हा 'इन्सिक्युर' आणि 'वॅम्पायर डायरीज' या वेबसिरिजमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. लॉस एंजिल्स येथे जॉर्ज फ्लॉयडला न्याय मिळावा म्हणून मोठ्य़ा प्रमाणात आंदोलन पसरले आहे. नागरिक रस्त्यावर उतरून सरकारविरोधी घोषणाबाजी करत असून दोषी पोलिसांना अटक करण्याची मागणी करत आहेत.
आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठाचार्ज केला तसेच रबरी गोळ्याही झाडल्या. यातील एका गोळीने सॅम्पसन जखमी झाला आहे. यासंबधीचा एक व्हिडिओही त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये पोलीस आम्हाला अटक करण्यार असल्याचे म्हणताना तो दिसत आहे. पोलिसांची काठी लागल्यानेही तो जखमी झाला आहे.