वॉशिंग्टन- निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने पराभूत केल्यानंतर जो बिडेन नव्हे तर कमला हॅरीस या देशाच्या अध्यक्ष होतील, असा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला. त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या बिडेनच्या मानसिक क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ट्रम्प हे ओशकोशमधील निवडणूक प्रचार कार्यक्रमात बोलत होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या जो बिडेन यांच्या मानसिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, की वेड्या सामाजिक धोरणांतून देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त व्हावी, असे तुम्हाला वाटते का? जो बिडने आणि कमला हॅरीस हे झोपाळू आहेत.