महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Ukraine-Russia Tensions : रशिया-युक्रेनवर युद्धाचे ढग, जो बायडेन यांनी आखली योजना - , रशिया आणि युक्रेन वादावर अमेरिका

युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याचा वाढता धोका पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ( Joe Biden on Ukraine-Russia Tensions ) पुन्हा एकदा युक्रेनमधील अमेरिकन नागरिकांना देश सोडण्यास सांगितले आहे.

Joe Biden
जो बायडेन

By

Published : Feb 11, 2022, 1:27 PM IST

Updated : Feb 11, 2022, 6:00 PM IST

वॉशिंग्टन डी.सी - रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ लष्करी सराव सुरू केला असून रशिया यु्क्रेवर हल्ला करू शकते, असे म्हटलं जात आहे. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याचा वाढता धोका पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ( Joe Biden on Ukraine-Russia Tensions ) पुन्हा एकदा युक्रेनमधील अमेरिकन नागरिकांना देश सोडण्यास सांगितले आहे.

सर्व अमेरिकन लोकांनी युक्रेनमधून ताबडतोब निघून यावे. जगातील सर्वात मोठ्या सैन्यांपैकी येथे आव्हान आहे. गोष्टी फार लवकर बिघडू शकतात, असे बायडेन यांनी म्हटलं. रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनमधून अमेरिकन लोकांना संरक्षण देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत अमेरिका युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

युक्रेनमध्ये रशियन घुसखोरीचा धोका वाढला आहे. युक्रेनच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव सर्वाधिक वाढला आहे. सुमारे 130,000 रशियन सैन्य युक्रेनच्या सीमेवर अनेक शस्त्रास्त्रांसह तैनात असल्याचा अमेरिकेचा अंदाज आहे.

रशिया युक्रेनवर हल्ला करण्याचा मोठा कट रचत आहे. युक्रेनने रशियावर पहिल्यांदा हल्ला केला आणि नंतर प्रत्युत्तर म्हणून रशियाने कारवाई केली असे रशिया जगाला भासवले, असा दावा अमेरिकेने यापूर्वी केला होता. तसेच रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी भारताच्या भूमिकेचं स्वागतच केलं जाईल, असं अमेरिकेनं म्हटलं होतं. अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष भवन 'व्हाईट हाऊस'च्या प्रवक्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं होतं.

रशिया-युक्रेन वाद -

सोव्हिएत युनियनमधून वेगळा झाल्यापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे. युक्रेन हा रशियाचाच भाग असून त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे. मात्र, अनेक रशियन हे स्वतंत्र अस्तित्व मान्य करत नाहीत. अशात युक्रेन आणि नाटो देशांची जवळीक हा रशियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. युक्रेन आणि रशियामधील संघर्षाने आंतरराष्ट्रीय राजकरणात वादंग पाहायला मिळत आहे.

Last Updated : Feb 11, 2022, 6:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details