वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेमध्ये 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी जोरदार प्रचार मोहीम सुरू केली आहे. यातच जो बिडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा मास्क काढतानाचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
बायडेन यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प मास्क काढताना, तर बायडेन हे मास्क घालताना पाहायला मिळत आहे. 'मास्क घाला' असे कॅप्शन त्यांनी व्हिडिओला दिले आहे. मास्क वापरणे गरजेचे असून त्यामुळे आपण सर्व जण सुरक्षित राहू शकतो, असेही त्यांनी म्हटलं आहे.
तथापि, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर व्हाईट हाऊसला परतताच त्यांनी आपला मास्क काढत उपस्थितांना अभिवादन केले. ट्रम्प यांची कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर त्यांच्यावर वॉल्टर रीड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू होते.
प्रेसिडेंशियल डिबेट १५ ऑक्टोबरला
येत्या 15 ऑक्टोबरला दुसरी अध्यक्षीय चर्चा (प्रेसिडेंशियल डिबेट) होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे जर कोरोनाग्रस्त असतील तर, त्यांनी दुसऱ्या अध्यक्षीय चर्चेत सहभागी होऊ नये. सर्व नियमावली पूर्ण झाली तरच अध्यक्षीय चर्चेत त्यांनी सहभाग घ्यावा, असे बायडेन म्हणाले. तथापि, पहिली अध्यक्षीय चर्चा ( प्रेसिडेंशियल डिबेट) 7 ऑक्टोबरला पार पडली आहे. तर 15 ऑक्टोबरला दुसरी आणि 22 ऑक्टोबरला तिसरी अध्यक्षीय चर्चा होणार आहे.