महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

मास्क वापरण्यासंदर्भात जो बिडेन यांच्याकडून राष्ट्रव्यापी मोहीम सुरू - डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन

कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन प्रचारात ट्रम्पवर जोरदार निशाणा साधत आहेत. जो बिडेन यांनी आरोग्य तज्ञांना सांगून देशभरात मोहीम सुरू केली असून लोकांना मास्क घालायला सांगितले.

जो बिडेन
जो बिडेन

By

Published : Aug 14, 2020, 2:53 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेत राष्ट्रपदाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन प्रचारात ट्रम्पवर जोरदार निशाणा साधत आहेत. जो बिडेन यांनी आरोग्य तज्ञांना सांगून देशभरात मोहीम सुरू केली असून लोकांना मास्क घालायला सांगितले.

येत्या तीन महिन्यांत मास्क वापरल्यास कोरोना विषाणूपासून 40 हजार लोकांचे जीव वाचू शकतील. प्रत्येक नागरिकाने मास्क घालावे. मास्क घातल्याने तुमचे कोरोनापासून बचाव होईल आणि आजारी पडण्यापासून तुमचा बचाव होईल, असे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन म्हणाले.

या अभियानाचा विरोध करणाऱ्यावरही जो बिडेन यांनी टीका केली. 'ही अमेरिका आहे. देशभक्त व्हा, आपल्या सहकारी नागरिकांना संरक्षण द्या, योग्य गोष्ट करा. प्रत्येक नागरिकाने मास्क घालायला हवे. राज्यपालांनी प्रत्येकाला मास्क घालणे बंधनकारक केले पाहिजे, असे बिडेन म्हणाले.

दरम्यान, ट्रम्प प्रशासन देशभरातील शाळा जिल्ह्यांमध्ये 125 दशलक्ष मास्क पाठवित आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचा आग्रह केला. यापूर्वी ट्रम्प यांनी अनेकवेळा मास्क घालण्यास नकार दिला होता.

बुधवारी अमेरिकेत बुधवारी 1 हजार 499 नवीन कोरोना रुग्णांच्या मृत्यू झाला. मे पासून आत्तापर्यंतची सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details