महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

जेफ बेझोस हे अ‌ॅमेझॉनच्या सीईओ पदावरून होणार पायउतार - जेफ बेझोस न्यूज

अ‌ॅमेझॉन कंपनीने जेफ बेझोस हे पद सोडणार असल्याचे अचानक बुधवारी जाहीर केले आहे. त्यांच्या जागी अ‌ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे सीईओ जॅस्सी हे अ‌ॅमेझॉनच्या सीईओचा पदभार मार्च २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत स्वीकारणार आहेत.

जेफ बेझोस
जेफ बेझोस

By

Published : Feb 3, 2021, 2:58 PM IST

सीटल - जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीत मोठा फेरबदल होणार आहे. अ‌ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस हे पदावरून पायउतार होणार आहेत. ही माहिती कंपनीने बुधवारी जाहीर केली आहे.

जेफ बेझोस यांनी अ‌ॅमेझॉनची स्थापना २७ वर्षापूर्वी केली आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत जेफ यांचा दुसरा क्रमांक लागतो. अ‌ॅमेझॉन कंपनीने जेफ बेझोस हे पद सोडणार असल्याचे अचानक बुधवारी जाहीर केले आहे. त्यांच्या जागी अ‌ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे सीईओ जॅस्सी हे अ‌ॅमेझॉनच्या सीईओचा पदभार मार्च २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत स्वीकारणार आहेत.

हेही वाचा-जानेवारीत निर्यातीच्या प्रमाणात ५.३७ टक्क्यांची वाढ

कोरोना महामारीतही कंपनीने केली विक्रमी कामगिरी-

कंपनीने डिसेंबर २०२० च्या चौथ्या तिमाहीमधील आर्थिक कामगिरीची आकडेवारी जाहीर केली आहे. या तिमाहीत कंनपीने विक्री व सेवांमधून १०० अब्ज डॉलरचा व्यवसाय केला आहे. ५७ वर्षीय जेफ बेझोस म्हणाले की, अ‌ॅमेझॉन हे जे काही आहे, ते सर्व संशोधनामुळे आहे. जर तुम्ही सर्व बरोबर केले तर, काही वर्षानंतर आश्चर्यकारक संशोधन घडते. नवीन गोष्टी सामान्यवत होतात. लोक जांभया देतात. या जांभया म्हणजे संशोधकांना मिळालेली मोठी पावती असते. तुम्ही आमचे आर्थिक कामगिरी पाहिली तर हा सर्व संशोधनाचा एकत्रित परिणाम आहे. दरम्यान, जेफ बेझोस यांनी १९९४ मध्ये अ‌ॅमेझॉनची स्थापना केली आहे. काही वर्षांपासून जेफ हे कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहत नाहीत.

हेही वाचा-राज्यांच्या जीएसटी कर संकलनात वाढ होण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details