महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

"हे युद्ध आता अफगाणिस्तानचे आहे", पेंटागॉनची तालिबानवर हवाई हल्ले न करण्याची भूमिका - पाकिस्तान

अफगाणिस्तानात तालिबानचा वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर इथे हवाई हल्ल्यांत पुढाकार न घेण्याचे स्पष्ट संकेत अमेरिकेकडून देण्यात आले आहेत. हे युद्ध अफगाणिस्तानने जिंकावे वा हरावे अशा पद्धतीने आम्ही याकडे बघत असल्याचे पेंटागॉनने स्पष्ट केले आहे. मात्र आम्ही त्यांना सहकार्य करत राहू असेही पेंटागॉनने म्हटले आहे.

"हे युद्ध आता अफगाणिस्तानचे आहे", पेंटागॉनची तालिबानवर हवाई हल्ले न करण्याची भूमिका
"हे युद्ध आता अफगाणिस्तानचे आहे", पेंटागॉनची तालिबानवर हवाई हल्ले न करण्याची भूमिका

By

Published : Aug 10, 2021, 3:16 PM IST

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानात तालिबानचा वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर इथे हवाई हल्ल्यांत पुढाकार न घेण्याचे स्पष्ट संकेत अमेरिकेकडून देण्यात आले आहेत. हे युद्ध अफगाणिस्तानने जिंकावे वा हरावे अशा पद्धतीने आम्ही याकडे बघत असल्याचे पेंटागॉनने स्पष्ट केले आहे. मात्र आम्ही त्यांना सहकार्य करत राहू असेही पेंटागॉनने म्हटले आहे.

हे युद्ध आता अफगाणिस्तानचे

पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'हे युद्ध आता अफगाणिस्तानचे आहे. हा त्यांचा देश आहे. त्यामुळे त्यांनी काय करावे वा काय करू नये हा त्यांचा निर्णय आहे'. अफगाणिस्तानातील युद्ध हे स्पष्टपणे योग्य दिशेने जात नाहीये असेही त्यांनी म्हटले आहे. तालिबानने आणखी काही प्रांतांवर ताबा मिळविल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानपासून अंतर घेतल्याचेच यावरून दिसत आहे.

31 ऑगस्टपर्यंत अमेरिकन सैन्य घेणार माघार

अफगाणिस्तानातून माघार घेण्यासाठी अमेरिकेला केवळ तीन आठवडे आणि एक दिवसांचा कालावधी उरलेला आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून माघार घेत असतानाच तालिबानचा अफगाणिस्तानातील प्रभाव वाढत असून आतापर्यंत पाच प्रांतांच्या राजधानींवर तालिबानने ताबा मिळविला आहे. 31 ऑगस्टनंतर अमेरिकेकडून हवाई हल्ले सुरूच राहतील की नाही यावर बोलण्यास किर्बी यांनी नकार दिला आहे.

माघार घेण्यावर बायडेन प्रशासन ठाम

अफगाणिस्तानात तालिबानचा प्रभाव वाढत असला तरी अफगाणिस्तानातून या महिन्याच्या अखेरपर्यंत माघार घेण्यावर बायडेन प्रशासन ठाम असल्याचे व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. दरम्यान, 2001 मध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर तालिबान्यांना अफगाणिस्तानच्या सत्तेतून बाहेर काढण्यात आले होते.

स्थितीवर युएन मानवाधिकार प्रमुखांकडून चिंता

अफगाणिस्तानातील स्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करतानाच इथे शस्त्रसंधीची मागणी संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार प्रमुखांनी केली आहे. अफगाणिस्तानातील संघर्षातून वाचलेल्या महिला आणि मानवाधिकारांविषयी अतिशय चिंतीत असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आणि आपत्कालीन मदत समन्वयक शाखेच्या मार्टीन ग्रिफीथ यांनी म्हटले आहे. गेल्या महिनाभरातच अफगाणिस्तानातील संघर्षात एक हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

तालिबानची आश्रयस्थळे बंद करा, अमेरिकेच्या पाकला सूचना

अफगाणिस्तानातील संघर्षाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टीन यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पाकिस्तानने अफगाण सीमेनजिकची तालिबानची आश्रयस्थळे बंद करण्याची गरज व्यक्त केली. या आश्रयस्थळांमधूनच अफगाणिस्तानात असुरक्षितता आणि अस्थिरता निर्णाण होत असल्याचे पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले.

हेही वाचा -अफगाणिस्तानः अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात 200 हून अधिक तालिबानी दहशतवादी ठार

ABOUT THE AUTHOR

...view details