न्यूयॉर्क - सीरियात इसिस (ISIS) दहशतवादी संघटनेशी तब्बल ३ हजार दहशतवादी संलग्न असल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियाचे अमेरिकेतील उपप्रतिनिधी गेन्नाडी कुझमीन यांनी ही माहिती दिली. इसिस या संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच, येथील इसिसचे जाळे पसरलेल्या प्रदेशांमध्ये अमेरिकेने लष्करी कारवाई केली होती. तरीही या संघटनेशी संबंधित दहशतवादी अजूनही इतक्या प्रमाणात कार्यरत असल्याचे रशियाने म्हटले आहे.
'सध्या इस्लामिक स्टेट किंवा इसिस या दहशतवादी संघटनेतील आणि त्यांनी नवी भरती करून घेतलेले असे एकूण ३ हजार दहशतवादी सीरियामध्ये आहेत,' असे कुझमीन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सांगितले. इसिसचे जाळे पसरलेल्या प्रदेशांत लष्करी कारवाईनंतरही इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवादी कार्यरत असणे ही गंभीर बाब आहे.