जेफरसनविले (यूएसए) -दक्षिण इंडियाना प्रांतातील एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीची हत्या करत तिच्या शरीराचे काही भाग खाल्ल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले. त्याला मंगळवारी पॅरोलविना तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जोसेफ ओबरहांसले असे या आरोपीचे नाव आहे.
ओबरहॅन्स्ले 18 सप्टेंबर रोजी टॅमी जो ब्लांटनच्या मृत्यूप्रकरणी खून आणि घरफोडीच्या आरोपात दोषी ठरला. क्लार्क सर्किट न्यायाधीश विक्की कार्मिकल यांनी ज्युरीच्या शिफारसीच्या आधारे ओबरहॅन्स्लेला शिक्षा सुनावली.
46 वर्षीय ब्लांटनचा मृतदेह 14 सप्टेंबर 2014ला सकाळी तिच्या घरी आढळला. या मृतदेहावर 25पेक्षा जास्त तीक्ष्ण वार करत मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.