न्यूयॉर्क- अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या जास्त आहे. भारतीय वंशाची परिचारिका माधवी अया यांचा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. एकुलती एक 18 वर्षीय मुलगी मिन्नोली हिला भेटण्याची माधवी यांची इच्छा अपूर्ण राहिली. त्यांनी मिन्नोली हिला 3 दिवसांपूर्वी एक संदेश पाठवला होता. त्यामध्ये लवकरच घरी भेटायला येत असल्याचे सांगितले होते.
कोरोनामुळे माय-लेकींची झाली ताटातूट; भारतीय वंशाच्या नर्सच्या मृत्यूमुळे मुलीला भेटण्याची इच्छा राहिली अपुर्ण
अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या जास्त आहे. भारतीय वंशाची परिचारिका माधवी अया यांचा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. एकुलती एक 18 वर्षीय मुलगी मिन्नोली हिला भेटण्याची माधवी यांची इच्छा अपूर्ण राहिली.
माधवी अया यांनी मिन्नोली हिला 3 दिवसांपूर्वी पाठवलेला संदेश अखेरचा ठरला आहे. कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. माधवी अया यांचा मृत्यू रुग्णालयाच्या बेपर्वाईमुळे झाल्याचे माधवीचे पती आणि मुलगी मिन्नोली यांना वाटत आहे.
माधवी अया न्यूयॉर्क मधील ब्रुकलिन मधील वुडहल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात कोरोना रुग्णांची देखभाल करत होत्या. यादरम्यान रुग्णालयाने त्यांना एकच सर्जिकल मास्क दिला होता तो पुरेसा नव्हता यामुळे माधवी यांना कोरोनाचा संसर्ग झाला, असे त्यांच्या नातेवाईकांनी म्हटले. रुग्णालयाने या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 50 हून अधिक डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.