वॉशिंग्टन - अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका 17 वर्षीय मुलीने सुचवलेले नाव नासाच्या पहिल्या मंगळ हेलिकॉप्टरला देण्यात आले आहे. वनिजा रुपानी असे या मुलीचे नाव असून अमेरिकी स्टेट नोर्थ पोर्ट येथील अलबामा विद्यालयात ती शिकते.
नासाने आयोजित केलेल्या 'नेम द रोवर' स्पर्धेत तिने भाग घेतला होता. तिने पाठवलेल्या निबंधाच्या आधारे मंगळ हेलिकॉप्टरचे 'इंजनुइटी' नामकरण करण्यात आले आहे. नासाकडून मार्च महिन्यात यासाठी निबंध मागवण्यात आले होते. मंगळ मोहिमेत रोवरसोबत हे हेलिकॉप्टर मंगळावर जाणार आहे.