वॉशिंग्टन डी सी -अमेरिकेत 45व्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. आज तेथील निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी त्यांची निवड झाली आहे. लिबरटेरियन पार्टीचे उमेदवार प्रेस्टन नेल्सन यांचा त्यांनी पराभव केला. त्यांनी 71 टक्के मते मिळवली आहेत.
कोण आहेत राजा कृष्णमूर्ती ?
राजा कृष्णमूर्ती यांचा जन्म 19 जुलै 1973 ला नवी दिल्लीमध्ये एका तामिळ कुटुंबामध्ये झाला होता. ते तीन महिन्यांचे असतानाच, त्यांचे आई-वडील अमेरिकेला स्थायिक झाले होते. 2016 ला ते पहिल्यांदा हाऊस निवडून आले होते. तसेच 2000 च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी त्यांनी बराक ओबामा यांचा प्रचार केला होता. कृष्णमूर्ती हे पेशाने वकील आणि अभियंता आहेत.